Description
सेवेचा मुख्य उद्देश आहे की मन-वचन-कायेने दुसऱ्यांना मदत करणे. जो व्यक्ति स्वतःचा आराम आणि सुविधांसमोर दुसऱ्यांच्या गरजांना महत्व देतो ,तो जीवनात कधीही दुःखी होत नाही. मनुष्य जीवनाचे ध्येय दुसऱ्यांची सेवा करणे हेच असले पाहिजे. परम पूज्य दादा भगवानांनी हेच ध्येय सर्वोच्च ठेवले की जो पण व्यक्ति त्यांना भेटेल, त्याला कधीच निराश होऊन परतावे लागणार नाही. दादाश्री निरंतर ह्याच शोधात होते की लोकं कशाप्रकारे स्वतःच्या दुःखापासून मुक्त होतील आणि मोक्ष मार्गाकडे वाटचाल करतील. त्यांनी स्वतःच्या भौतिक सुख-सुविधांची पर्वा न करता जास्तीत जास्त लोकांचे भले होवो हीच इच्छा आयुष्यभर जपली होती. परम पूज्य दादाश्री मानत होते की आत्मसाक्षात्कार हा मोक्ष प्राप्त करण्याचा सर्वात सरळ-सोपा मार्ग आहे. परंतु ज्याला तो मार्ग मिळत नाही त्याने सेवेच्या मार्गावरच चालले पाहिजे. लोकांची सेवा करून स्वतः सुख कसे मिळवावे हे विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा.