• USD
Close

Books

  • Picture of मानव धर्म

मानव धर्म

मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे? माणूस जन्म घेतो तेव्हापासूनच संसार चक्रामध्ये फसून लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो

$0.24

Description

मनुष्य जीवनाचे ध्येय काय आहे? माणूस जन्म घेतो तेव्हापासूनच संसार चक्रामध्ये फसून लोकांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो.परम पूज्य दादा भगवान म्हणतात, मनुष्य जन्म चार गतिंचे जंक्शन आहे. जिथून देवगति, जनावरगतिमध्ये जाण्याचा रस्ता मोकळा होतो. ज्या प्रकारचे बी पेरले आहे आणि ज्या कारणांचे सेवन केले आहे, त्या गतिमध्ये जावे लागते.मग या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती केव्हा मिळेल? दादाजी आपल्याला सांगतात की, ‘मानवता’ किंवा ‘मानवधर्माची’ सर्वोत्तम व्याख्या हीच आहे की, कोणी तुम्हाला दुःख दिले, ते जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना दुःख होईल असा व्यवहार करू नये. पुढच्या जन्मी नर्कगति किंवा जनावर गतिमध्ये जायचे नसेल तर मानवधर्माचे नेहमी पालन केले पाहिजे. याविषयी अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा. आणि आपले मनुष्य जीवन सार्थक करा.

Read More
success