Description
चिंतेने कामे बिघडतात असा निसर्गाचा कायदा आहे. चिंतामुक्त झाल्याने सर्व कामे सुधारतात. सुशिक्षित, श्रीमंत लोकांच्या घरात अधिक चिंता आणि तणाव आहेत. ह्यांच्या तुलनेने मजुरी करणारे काळजीमुक्त असतात आणि शांतपणे झोपतात. त्यांच्या शेठाला (बॉस) झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. चिंतेने लक्ष्मीही निघून जाते. दादाश्रींच्या जीवनातले एक छोटेसे उदाहरण आहे. जेंव्हा त्यांना व्यापारात नुकसान झाले, तेंव्हा ते कसे चिंतामुक्त झाले. “एकदा, ज्ञान होण्याअगोदर, आम्हाला नुकसान झाले होते. तेंव्हा आम्हाला पूर्ण रात्र झोप आली नाही, आणि चिंता होत राहिली. तेंव्हा आतून उत्तर मिळाले की ह्या नुकसानाची चिंता आता कोण-कोण करत असेल? मला वाटले की माझे भागीदार तर कदाचित आता चिंता करत नसतील ही. एकटा मीच चिंता करत आहे. आणि बायको-मुले आहेत, त्यांना तर काही माहितच नाही. आता ते काही जाणतही नाहीत, तरीही त्यांचे चालते, तर मी एकटाच कमी अक्कलवाला आहे जो सगळ्या चिंता घेऊन बसलो आहे. त्यानंतर मला अक्कल आली, कारण ते सर्व भागीदार असूनही चिंता करत नाहीत, तर मी एकट्यानेच चिंता का करावी?” चिंता काय आहे? विचार करणे ही समस्या नाही आहे. आपल्या विचारात तन्मयाकार होताच चिंता सुरु. ‘कर्ता’ कोण आहे हे समजल्यावरच चिंता जाईल.