• INR
Close

Books

  • Picture of सत्य-असत्याचे रहस्य

सत्य-असत्याचे रहस्य

बरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात

Rs 20.00

Description

बरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात. काही गोष्टी, काही लोकांसाठी सत्य मानल्या जातात तर काही लोक त्याचा तिरस्कार करतात. अशा दुविधेमुळे लोकांना प्रश्न पडतो की शेवटी सत्य कशास म्हणावे आणि असत्य कशास म्हणावे? आत्मज्ञानी परम पूज्य दादा भगवान आपल्याला सत्, सत्य आणि असत्य या तीन्ही शब्दांचे भेद समजावतात. ते सांगतात की, सत्म्हणजे शाश्वत तत्त्व, जसे की आपला आत्मा, की जो एक परम सत्य आहे आणि त्यास बदलणे संभव नाही. आपण शाक्षात आत्मस्वरुप आहोत आणि हिच आपली खरी ओळख आहे, यास दादाश्रींनी सत्म्हटले आहे. व्यवहार सत्य म्हणजे रिलेटिव्हमध्ये दिसणारे सत्य की जे लोकांच्या मान्यतेमुळे निर्माण झाले आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या आपापल्या दृष्टीकोनाच्या आधारे वेगवेगळे असते. सत्य आणि असत्य तर आपल्या माया आणि मान्यतांमुळेच उभे होत असतात आणि ती एक सापेक्ष संकल्पनाच आहे, ज्याचा काही आधार नसतो. सत्, सत्य आणि असत्याचे गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपल्या भ्रामक मान्यतांपासून मुक्त व्हा.

Read More
success