Close
Picture of भोगते त्याची चुक (Marathi)

भोगते त्याची चुक (Marathi)

"जो भोगतो त्याची चूक". प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी "भोगतो त्याची चूक" चे विज्ञान प्रकट केले आहे. हे प्रयोगात आणल्याने आपल्या जीवनातील सर्व गुंतागुंती सोडवल्या जातील, असे हे अनमोल सूत्र आहे.
Availability: In stock
£0.12
:
Description

जो दुःख भोगतो त्याची चूक आणि जो सुख भोगतो ते त्याचे इनाम असते. पण भ्रांतीचा कायदा निमित्तास पकडतो. भगवंताचा कायदा हा खरा  (रियल) कायदा, तो ज्याची चूक असेल त्यालाच पकडतो. तो कायदा तंतोतंत (अ‍ॅक्झॅक्ट) आहे. व त्यात कोणी परिवर्तन करू शकणार असा नाहीच. जगात असा कुठलाच कायदा नाही जो कोणाला भोगयेला लावेल (दुःख देईल). जेंव्हा कधी आपल्याला आपल्या चुकीशिवाय भोगावे लागते, तेंव्हा हृदयास वेदना होतात आणि ते विचारत असतो - माझा काय अपराध आहे? मी काय चूक केली आहे?  चूक कोणाची आहे? चोराची की ज्याचे चोरीला गेले त्याची? ह्या दोघांपैकी कोण भोगत आहे? "जो भोगतो  त्याची चूक". प्रस्तुत संकलनात दादाश्रींनी "भोगतो त्याची चूक" चे विज्ञान प्रकट केले आहे. हे प्रयोगात आणल्याने आपल्या जीवनातील सर्व गुंतागुंती सोडवल्या जातील, असे हे अनमोल सूत्र आहे.