• USD
Close

Books

  • Picture of प्रेम (Marathi)

प्रेम (Marathi)

खरे प्रेम आपण कशास म्हणतो? खरे प्रेम त्यास म्हणतात की जे कधी वाढत नाही आणि घटतही नाही, नेहमी एक समानच राहते.

$0.24

Description

खरे प्रेम आपण कशास म्हणतो? खरे प्रेम त्यास म्हणतात की जे कधी वाढत नाही आणि घटतही नाही, नेहमी एक समानच राहते. आपल्याला वाटते की आपल्या जवळपास राहणा:या सर्वांवर आपले प्रेम आहे पण जेव्हा ते आपल्या म्हणण्यानुसार करत नाहीत तेव्हा लगेचच आपल्याला राग येतो. पूज्य दादा भगवान यास प्रेम म्हणत नाहीत. ते म्हणतात की ही सर्व तर भ्रांतीच आहे. खरे प्रेम तर त्यास म्हणतात की ज्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते आणि ते प्रेम कुठल्याही परिस्थितीत सर्वांवर एक समानच राहते. असे खरे प्रेम तर फक्त एक ज्ञानीच करु शकतात. ज्ञानींना लोकांसाठी कोणताही भेदभाव वाटत नाही आणि म्हणूनच त्यांचा व्यवहार सर्वांशी अतिशय स्नेहपूर्ण असतो. तरी देखील आपण जर थोडे प्रयत्न केले तर काही अंशी असे प्रेम आपल्या आत सुद्धा उत्पन्न करु शकतो. हे सर्व कसे शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपले जीवन प्रेममय बनवा.

Read More
success