Description
दान म्हणजे स्वत:चे काहीतरी दुसऱ्याला देणे. मग ते पैशाच्या, खाण्याच्या, किंवा कोणाला काही सुख देण्याच्या रुपात पण असू शकते. दान केल्याने आपल्याला आनंद मिळतो. कारण आपल्याला वाटते की आपण आपण काही चांगले काम केले आहे. दान केल्याचे खूप फायदे आहेत. ज्याचे विस्तृत वर्णन दादाश्रींनी त्यांच्या ‘दान’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकातून दादाजी आपल्याला सांगतात की दान कोणाला द्यावे? दानात काय द्यावे? दान केल्याचे फायदे काय आहेत? इत्यादी सर्व. दान केल्याने आपण फक्त समोरच्याची मदत करत नाही परंतु स्वतःसाठीही खूप सुख मिळवतो. दानाचे महत्त्व आपल्या जीवनात काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा.