Description
मुलांच्या संगोपनात आई–वडिलांचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. आई–वडील असे प्रेमळ असावेत की त्यांचे प्रेम पाहून मुले त्यांच्यापासून दूर जाणारच नाही. आई–वडील मुलांना दटावत राहिले किंवा मारत राहिले तर मुले निश्चित त्यांचे ऐकणार नाही आणि उलट मार्गावर वळतील. आई–वडिलांच्या उच्च संस्कारामुळेच घरात आनंदमय, शांतीचे वातावरण निर्माण होऊ शकेल. काचे समान बालमनाला कसे हाताळायचे ? त्यांच्यावर उच्च संस्कार कसे घडवायचे ? तरुण पिढीसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार कसा करावा ? ह्याचे पूर्ण मार्गदर्शन ह्या संक्षिप्त पुस्तकात दिलेले आहे. त्याचबरोबर मुलांनाही तरुणवयात भेडसावणाऱ्या अनेक समस्यांचे समाधान कसे मिळवावे ? त्यांना स्वत:च्या आई–वडिलांसोबत कसा व्यवहार करावा ? आई–वडिलांच्या सेवेचे महात्म्य आणि त्यांचे उत्तम परिणाम कोणते ? ह्या सर्व गोष्टींसाठी सुद्धा सुंदर मार्गदर्शन येथे संकलित केलेले आहे, जे निट समजून घेतल्याने आई–वडील आणि मुलांचा एकमेकांशी आदर्श व्यवहार नक्कीच संस्थापित करता येईल.