Description
पति-पत्नी हे संसार रथाचे दोन चाक आहेत. ज्यांच्यात सुमेळ असणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक घरात पति-पत्नीमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टींवर संघर्ष, क्लेश होतच राहतात ज्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण तणावपूर्ण होत असते. ह्याचा परिणाम घरातील अन्य सदस्यांवर सुद्धा होतो. खासकरून मुलांवर त्याचा दुष्परिणाम जास्त होत असतो! पूज्य दादा भगवान सुद्धा विवाहित होते परंतु स्वत:च्या विवाहित जीवनात त्यांना कधीही, कुठल्याही बाबतीत त्यांच्या पत्नी (हिराबा) सोबत वादविवाद झाले नव्हते. आपल्या ह्या ‘पति-पत्नीचा दिव्य व्यवहार’ पुस्तकात दादाश्री आपल्याला वैवाहिक जीवन आदर्श बनविण्यासाठी पुष्कळ चाव्या देत आहेत. स्वत:चे अनुभव आणि ज्ञानासोबत, लोकांकडून विचारल्या गेलेल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देतांना दादाश्रींनी अत्यंत मोलाचे असे कितीतरी उपाय सांगितले आहेत. ज्यांचे पालन केल्याने पती आणि पत्नी एकमेकांशी समंजसपणे, प्रेमाने व्यवहार करू शकतील. तेव्हा मग वैवाहिक जीवन खऱ्या अर्थाने शोभून दिसेल.