Description
परम पूज्य दादाश्रींचे ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या आतील सर्व क्रियांना पाहू शकाल आणि विश्लेषणही करु शकाल. ही समज, पूर्ण ज्ञान अवस्थेपर्यंत पोहचण्यासाठीची सुरुवात आहे. ज्ञानाच्याप्रकाशात तुम्ही विना राग-द्वेष, स्वत:च्या चांगल्या तसेच वाईट विचारांच्या प्रवाहाला पाहू शकाल. तुम्हाला चांगले किंवा वाईट पाहण्याची गरज नाही, कारण विचार परसत्ता आहे. तर मग प्रश्न हा आहे की ज्ञानी या जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतात? तर ज्ञानी जगाला निर्दोष पाहतात. ज्ञानी हे जाणतात की जगातील सर्व क्रिया पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. ते हे जाणतात की जग निर्दोष आहे. नोकरीत साहेबांसोबत झालेले भांडण किंवा अपमान, हे केवळ तुमच्या पूर्वी चार्ज केलेल्याचे डिस्चार्ज आहे. साहेब तर फक्त निमित्त आहेत. संपूर्ण जग निर्दोष आहे. ज्या पण काही अडचणी आपल्यावर येतात त्या तर मूळत: आपल्याच चुकांच्या परिणाम स्वरुपात आहेत. त्या सर्व आपल्याच ब्लंडर्स व मिस्टेक्स आहेत. ज्ञानींच्या कृपेने सर्व चुका मिटून जातात. आत्मज्ञान नसलेल्या माणसाला स्वत:च्या चुका न दिसता फक्त दुसऱ्यांच्याच चुका दिसतात. निजदोष दर्शनावर परम पूज्य दादाश्रींची समज, उपाय आणि त्यास जीवनात उतरवण्यासाठीच्या चाव्या या पुस्तकात संकलित केलेल्या आहेत. ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या मन, वचन, कायेचा पक्ष घेणे बंद करता आणि निष्पक्षपणे स्वत:च्या चुका स्वत:ला दिसू लागतात, तसेच अंतरशांती लाभण्याची सुरुवात होते.