Description
प्रत्येक माणूस स्वत:च्या मर्जी विरुद्ध चुका करत असतो. लोक आपल्या स्वतःच्या च चुकांमध्ये अडकतात आणि अविरत भोगत राहतात. त्यांना खरोखर चुकांपासून सुटकेची व आंतरिक आनंद मिळवून मुक्तिमार्गे प्रगति करण्याची तीव्र इच्छा असते. तीर्थंकर (पूर्णतः ज्ञान मिळवून मुक्त झालेले) आणि ज्ञानी (आध्यात्मिक विज्ञान आत्मसात केलेले) ह्यांनी ह्या जगास अशा पीडांपासून सोडवण्यासाठी एकमेव शस्त्र दिले आहे, आणि ते म्हणजे आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान ह्यांचे आध्यात्मिक विज्ञान. (आलोचना = स्वतःच्या चुकांचा कबुलीजबाब, प्रतिक्रमण - क्षमा मागणे, प्रत्याख्यान = चूक पुन्हा कधी न करण्याचा दृढ निर्धार) ह्या शस्त्राद्वारे द्वेष आणि तिरस्काराचा विशाल वृक्ष समूळ नष्ट करुन असंख्य लोकांनी मुक्तिरूपी संपत्ति मिळवली आहे. ज्ञानीपुरुष दादा भगवान यांनी आपल्या ज्ञानवाणी द्वारा प्रतिक्रमणाचे विज्ञान यथार्थपने जसे च्या तसे प्रकट केले आहे. त्यांची ज्ञानवाणी ह्या व इतर पुस्तकात आहेत, जी सत्य व मुक्तिच्या इच्छुकांसाठी बहुमोल ठरनार.