• USD
Close

Books

  • Picture of भावना सुधारे जन्मोजन्म  (MARATHI)

भावना सुधारे जन्मोजन्म (MARATHI)

जीवनव्यवहारात आपण सर्वांना असा अनुभव होत असतो कि जे नाही करायचे ते होऊन जात असते आणि जसे करायचे आहे तसे होत नाही ! जसेकी आपण निश्चय केला असेल कि , मला कोणालाही दु:ख दयायचे नाही , तरी पण आपल्याकडून दु:ख दिले जाते ! कठोरभाषा , टोचणारी भाषा नाही बोलायची , कोणाचा तिरस्कार नाही करायचे , विकारी भाव नाही करायचे ....

$0.24

Description

जीवनव्यवहारात आपण सर्वांना असा अनुभव होत असतो कि जे नाही करायचे ते होऊन जात असते आणि जसे करायचे आहे तसे होत नाही ! जसेकी आपण निश्चय केला असेल कि , मला कोणालाही दु:ख दयायचे नाही , तरी पण आपल्याकडून दु:ख दिले जाते ! कठोरभाषा , टोचणारी भाषा नाही बोलायची , कोणाचा तिरस्कार नाही करायचे , विकारी भाव नाही करायचे .... तरी सुद्धा हे सर्व दोष आपल्याकडून होऊन च जात असतात . आणि तेव्हा मग आपण खूप हताश होतो , खेद होतो कि इतके धर्म केले , धार्मिक क्रिया केली , उपदेश ऐकले आणि त्याप्रमाणे आचरण करायचे निश्चय हि केला तरी देखील तसे होत का नाही ? ह्याचे रहस्य काय ? चूक काय ? त्यावर उपाय काय ? परमपूज्य दादाश्रींनी या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण एका नव्याच रीतीने , अगदी वैज्ञानिक पद्धतीने इथे दिले आहे . दादाश्री सांगतात , वर्तन हे गेल्या जन्मात केलेल्या भावांचे परिणाम आहे , हे परिणाम असे सरळ सरळ बदलता येत नाहीत , त्यासाठी ‘कारण’ बदल करायला हवे , अर्थात नव्याने भाव बदल करावे . आणि त्यासाठी दिली नवकलम रुपी भावना !! ज्यात दादाश्रींनी सर्व शास्त्रांचे सार समावून घेतले आहे . जन्मोजन्म सुधारणारी हि भावना भावल्यामुळे “भाव “ मुळापासून बदलेल आणि आंतरशांती राहणार . इतकेच नव्हे तर त्याने आपले कितीतरी दोष हि धुतले जातील ! दुनियेत कोणा बरोबर वैर रहाणार नाही . सर्वान बरोबर मैत्री होऊन जाईल , एवढी गजबची शक्ती ठेवली आहे दादाश्रींनी ह्या नवकलमा मध्ये ! किंमत समजली तर काम होऊन जाईल !

Read More
success